महाराष्ट्रातील पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभर दौरे आयोजित केले आहेत. राज ठाकरे 14 डिसेंबर रोजी मराठवाडा दौऱ्यावर येणार असुन पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यांच्या तारखा निश्चित झाल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज मुंबईत पार पडली.राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात या बैठकीत रणनिती आखली गेली. त्यानुसार महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये राज ठाकरेंचा दौरा आयोजित करण्यात आला. या बैठकीला बाळा नांदगावकर, नितीन देसाईंसह महत्त्वाचे नेते उपस्थित होते.