मनोरंजन :‘गोष्ट एका पैठणीची’ हृदयापर्यंत पोहोचणारा सिनेमा

0
55

मुंबई, दि.५:  साध्या सरळ गोष्टीतून मनाचे सुख नेमके काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. आपले सुख, हास्य कसे मिळवता येईल हाच या सिनेमाचा गाभा असल्याने हा सिनेमा आपल्या हृदयापर्यंत पोहोचतो असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वतीने मंत्रालयातील महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘गोष्ट एका पैठणीची‘ या चित्रपटाच्या  विशेष शोचे आयोजन आज संध्याकाळी आयनॉक्स सिनेमागृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी या चित्रपटात मुख्य भूमिका करणारी अभिनेत्री सायली संजीव, अभिनेता सुब्रत जोशी,दिग्दर्शक शंतनु रोडे, अभिनेता पुष्कर क्षोत्री, प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर, सुनील बोधनकर, दीपा त्रासी, आदी उपस्थित होते.

अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि पियुष सिंग यांनी प्लॅनेट मराठी प्रॉडक्शन, गोल्डन रेशो फिल्म्स आणि लेकसाइड प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित, शांतनु गणेश रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची हा आगामी मराठी चित्रपट आहे. सायली संजीव, सुव्रत जोशी, मिलिंद गुणाजी आणि मृणाल कुलकर्णी यांनी या चित्रपटात भूमिका केल्या आहेत. 

भारताच्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाला मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here