मनोरंजन: साऊथच्या ‘जेलर’ चित्रपटाचा अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर

0
146
‘जेलर’ चित्रपट,
साऊथच्या ‘जेलर’ चित्रपटाचा अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर

मुंबई (प्रतिनिधी): गुन्हेगाराला सुधारण्याची संधी मिळाली तर गुन्हेगाराच्या आयुष्यात काय बदल घडून येऊ शकतो, या विषयावर आधारीत ‘जेलर’ चित्रपटाचा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर १९ एप्रिल २०२४ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ल्यात-समर्पण-फ/

जेलर शांताराम याने सरकारला एक प्रस्ताव सादर केला आहे. ज्यात तो पाच गुन्हेगारांची निवड करेल. त्यांना एका ओसाड ठिकाणी घेऊन जाईल आणि त्या ओसाड जमिनीला हिरव्यागार शेतीत रूपांतर करून गुन्हेगारांना एका नव्या आयुष्याची सुरुवात करून देईल. सरकार हा प्रस्ताव मंजूर करते, परंतु जर गुन्हेगारांनी कोणताही गुन्हा केला तर शांतारामला आपली नोकरी सोडून तुरुंगात जावं लागेल अशी अट घालते. जेलर शांतरामचा गुन्हेगारांना सुधारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का, हे चित्रपटात पहायला मिळणार आहे.

“मराठी रसिक प्रेक्षक आजवरच्या प्रत्येक चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देत आहेत, याचा अर्थ त्यांना अल्ट्रा झकासचे चित्रपट खूप आवडत आहेत. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी जेलर सारखा आणखी एक जबरदस्त दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित करताना अत्यंत आनंद होत आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी:- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here