कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाःकार माजला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रातील प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि मिस्टर इंडिया किताब जिंकलेल्या जगदीश लाड याचा मृत्यू झाला आहे.काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाल्यानंतर गुजरातमधील बडोदा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज अखेर जगदीशची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.