मुबंई- सुप्रीम कोर्टामध्य़े मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. महाविकास आघाडी सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) विद्यार्थी आणि नोकरीसाठी पात्र उमेदवारांना 10 टक्के आरक्षण जाहीर केले आहे. यानुसार, मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये आर्थिक दुर्बल घटकांच्या १० टक्के आरक्षणाचा लाभ आता घेता येणार आहे. त्याबरोबर सरळ सेवा भरतीतही मराठा उमेदवारांना आरक्षणाचा 10 टक्के लाभ घेता येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा समाज संतप्त झाला होता. आता मराठा आरक्षण रद्द झाल्यावर मराठा समाजाला EWS आरक्षण लाभ देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.