महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहे. आयोगामार्फत आता 290 पदांसाठी 17 संवर्गात ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 2 जानेवारी 2022 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार असून राज्यभरातील 37 जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे. या परीक्षासंदर्भात आयोगाने ट्विट करून माहिती दिली आहे.
पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी 7, 8 आणि 9 मे 2022 रोजी किंवा त्यानंतर आयोजित केल्या जाऊ शकतात. या परीक्षेसाठी उमेदवार उद्यापासून म्हणजेच 5 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेपासून अर्ज करू शकतात. तसेच अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर आहे.