हवामान विभागाने कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील उद्यापासून चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र आणि त्याचा पश्चिम आणि मध्य भारतातून प्रवासाच्या शक्यतेमुळे राज्यात चार ते पाच दिवसात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.राज्यात 30 ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात परभणी, नाशिक, ठाणे आणि रायगडसह पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात 29 ऑगस्टपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावासाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. यामुळे काही भागात पावसाअभावी दुबार, तर काही ठिकाणी तिबार पेरणीचं संकट निर्माण झालं होतं. यामुळे बळीराजा चिंतेत होता. मात्र आता राज्यातील शेतकऱ्याना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.