राज्यात उष्णतेची लाट आहे.याबाबत रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी संगितले की, रेल्वे बोर्डाने मुंबईत एसी लोकल ट्रेनच्या भाड्यात 50 टक्के कपात केली आहे. या निर्णयाला मंजूरी मिळाली आहे. त्यानुसार एसी लोकलच सध्या कमीत कमी भाडं 65 रुपयांवरुण 30 रुपयांवर आलं आहे.
सध्या राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट आहे. मुंबईत देखील तापमान 40 अंशाच्या जवळपास पोहचले आहे. उषणाता वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून एसी ट्रेनची मागणी वाढली आहे. असहाय्य अशा या उन्हात एसी लोकलने प्रवास करण्यास मुंबईकर पसंती देत आहे. यामुळे ट्रेनमध्ये बसायला सुध्दा जागा मिळत नसल्याची स्थिती साध्या लोकल ट्रेनच्या बाबतीत घडली आहे.आता तिकिटाचे दर 50 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे.