मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहासाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

0
94

 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेले मुंबई शहर जिल्ह्यातील मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहांचे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया दि. 22 नोव्हेंबर 2021 रोजी पासून सुरु झाली आहे.

राज्यातील मुंबई वगळुन इतर जिल्ह्यातील विद्यार्थी व विद्यार्थीनींनी खालील पत्त्यावर कार्यालयीन वेळेत ऑफलाईन प्रवेश आवेदन पत्र प्राप्त करुन त्यासोबत जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतल्याची पावती, 2 पासपोर्ट फोटो इत्यादी जोडून आवेदनपत्र सादर करण्यात यावे.

वसतिगृहाचे नाव, पत्ता व गृहपाल संपर्क क्रमांक  पुढीलप्रमाणे आहे.मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बी.डी.डी.चाळ, वरळी-118, मुंबई-400018, संपर्क क्र. 8830316553 ; डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, वरळी-116, बी.डी.डी.चाळ, वरळी-116, मुंबई-400018, संपर्क क्र. 8830316553 ; संत मिराबाई मुलींचे शासकीय वसतिगृह, वरळी-116, बी.डी.डी.चाळ, वरळी-116, मुंबई-400018, संपर्क क्र.9987790430 असे  पत्रकाद्वारे मुंबई शहरचे सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here