मुंबईचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावाला याचा गुरुवारी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये मृत्यू झाला असे वृत एएनआयने दिले आहे. युसुफ लकडावाला बॉलिवूडचे प्रसिद्ध फिल्म फायनान्सरही होते. त्याचा मृतदेह जेजे रुग्णालय येथे आणण्यात आला आहे. मात्र, त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप उघड झालेले नाही.जमिनी बेकायदेशीरपणे आपल्या ताब्यात ठेवल्याच्या आरोपाखाली त्याला ईडीने अटक केली होती.