मे. मिनरल्स ॲँड मेटल्सला खाणकाम तात्काळ थांबविण्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश

0
115

सिंधुदुर्ग

दोडामार्ग तालुक्यातील मौजे कळणे येथील 32.25 हेक्टर आर क्षेत्रावरील खाणपट्ट्यामध्ये 29 जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियन 2005 नुसार जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी खाणपट्ट्यातील खाणकाम व खनिजाची वाहतूक पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत तात्काळ बंद करण्याचे आदेश मे.मिनरल्स ॲँड मेटल्स यांना आज दिले.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 30 मधील पोट कलम 3 व 5 अन्वये, हे आदेश देतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी खाण सुरक्षा निर्देशालय, प्रादेशिक कार्यालय, गोवा यांच्या निर्देशानुसार आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्याबाबत ही आदेशीत केले आहे. मे मिनरल्स ॲँड मेटल्स करिता संचालक संदीप श्रीवास्तव व व्यवस्थापक माईन्स मॅनेजर, कळणे माईन यांना पाठविलेल्या या आदेशात म्हटले आहे, 29 जुलै रोजी सकाळी 8 ते 8.30 वा. दोडामार्ग तालुक्यातील मौजे कळणे येथील प्रमुख खनिज खाण पट्ट्यातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर होऊन 20 ते 25 कुटुंबांच्या घरामध्ये पाणी गेले. तसेच शेतीचे व बागायतीचे नुकसान झाले आहे. मंजूर असलेल्या खाणपट्ट्याच्या उत्तरेकडील बाजूस असलेल्या डोंगराचा काही भाग व बेंचेस पाणी भरलेल्या खड्ड्यामध्ये पडले. त्यामुळे खड्ड्यातील पाणी मोठ्या प्रमाणावर बाहेर फेकले गेले. या खड्ड्यास असलेला बांध फुटून पाणी दुसऱ्या खडड्यामध्ये आले. पाण्याच्या अतिरिक्त दबावामुळे खाणीच्या दक्षिणेकडील बांध फुटला व त्यातील माती मिश्रीत पाणी मोठ्या प्रमाणात गावाच्या दिशेने प्रवाहित झाले. हे पाणी गावातील स्थानिकांच्या घरामध्ये, शेतामध्ये व बागायतींमध्ये शिरले. पाण्याचा प्रवाह हा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे यात घरांचे, शेतीचे, बागायतींचे व प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले आहे.

सावंतवाडी उपविभागीय अधिकारी यांनी सादर केलेल्या प्राथमिक पाहणीनुसार एकूण 14 घरे / गोठे यांचे एकूण 14 लाख रुपये आणि भात शेती, नागली बागायती अंदाजे 30 हेक्टर क्षेत्राचे सर्वेक्षण व पंचनामे करण्याचे काम कृषी विभागामार्फत सुरू असल्याचे कळविले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here