हा कोरोनानंतर होणार आजार कोरोना रुग्णांमध्ये म्युकर मायकोसिस नावाचा एक बुरशीजन्य आजार आढळून येत आहे. या आजारामुळे अनेकांचे डोळे जात असल्याचं आढळून आलं आहे. म्युकरमायकोसिस या आजाराचा समावेश राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात आला आहे.कोरोना रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीस हा बुरशीजन्य आजार बळावत असल्याचं पाहायला मिळत आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास माणूस दगावण्याची शक्यता असते.
त्यामुळे यावर योग्य वेळी आणि योग्य उपचार घेणे महत्वाचे आहे.म्युकर मायकोसिस हा आजार बुरशीचा संसर्ग आहे. जे लोक मोठा काळ आपल्या इतर आजारांचा उपचार घेत आहेत त्यांची वातावरणातील रोगजंतूंशी लढण्याची क्षमता कमी होते. अशावेळी या बुरशीचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो. श्वासोच्छवासाद्वारे हे जंतू नाकातून फुफुसात पोहचतात.
म्युकरमायकोसिसची लक्षणं काय?डोळे किंवा नाक किंवा दोन्हींच्या आजूबाजूला लालसरपणा आणि वेदना होणेतापडोकेदुखीखोकलादम लागणे रक्ताच्या उलट्या,तणाव
काय काळजी घ्याल?जर धुळ असलेल्या ठिकाणी किंवा बांधकामाच्या ठिकाणी जात असाल तर मास्कचा वापर करा.मातीत काम करण्याआधी बूट, लांब पँट आणि लांब बाह्यांचा शर्ट आणि हातात ग्लोव्ह्ज घाला.व्यक्तिगत स्वच्छता पाळा त्यासाठी संपूर्ण शरीर घासून अंघोळ करा.
म्युकरमायकोसिस झाल्याचा संशय कधी घ्यावा?नाकबंद होणे, नाकातून काळा किंवा रक्तयुक्त द्रव येणे, गालाचं हाड दुखणेचेहऱ्याच्या एका बाजूने दुखणे, सूज येणेदात दुखणे, दात हलणे किंवा पडणे, जबडा दुखणेअंधुक दिसणे, डोळे दुखणे, वेदना होणेछाती दुखणे, श्वासोच्छवासाचा त्रास होणे