रत्नागिरी: गड नदी प्रकल्प बाधितांचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा अॅडीशनल कलेक्टर श्री.शिंदेच्याबरोबर अशोकराव जाधव यांनी घेतली बैठक

0
118
गड नदी प्रकल्पग्रस्थांच्या समस्येबद्दल रत्नागिरी जिल्हा अॅडीशनल कलेक्टर श्री शिंदे यांना निवेदण देताना श्री अशोकराव जाधव,ऊपाध्यक्ष-प्रवक्ते रत्नागिरी जिल्हा काँग्रेस , अध्यक्ष शेतकरी कष्टकरी संघटना महाराष्ट्र राज्य सोबत ऊत्तम गायकवाड, शेतकरी कष्टकरी संघटना अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा , शांताराम बल्लाळ प्रकल्पग्रस्थांचे नेते , गोविंद निर्मळ आदी .

गड नदी प्रकल्प बाधितांना नोकरी देता येत नसेल तर १८ वर्षावरील मुला, मुलींना प्रत्तेकी 3५ लाख रुपये द्यावेत यां मागणीचे निवेदन जिल्हा अॅडीशनल कलेक्टर श्री शिंदेना अशोकराव जाधव देत त्यांच्या दालनात झाली बैठक

प्रतिनिधी: अभिमन्यू वेंगुर्लेकर

रत्नागिरी – गड नदी व जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पग्रस्थांचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी आता श्री अशोकराव जाधव काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि शेतकरी -कष्टकरी संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष यांनी लक्ष घातले असुन नुकतीच या प्रश्नाबाबत सोमवार दिनांक 31 / 1 / 2 o 22 रोजी अॅडिशनल कलेक्टर श्री शिंदे यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीसाठी वेळ प्रकल्पग्रस्थांच्या वतीने मागण्यात आली होती आणि त्या वेळेनुसारच ही बैठक पार पडली.

या बैठकीत एकून सहा मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली .

गड प्रकल्पा मधील प्रकल्पग्रस्थांनी पासष्ट टक्के रक्कम भरूनही अद्याप त्यांना कायद्याने जी पर्यायी जमिन देणे आहे ती अद्याप मिळाली नाही असे ४3 प्रकल्पग्रस्थ आहेत. त्याच बरोबर त्यांना बारा टक्के व्याजही अद्याप दिलेले नाही, तर तीन शेतकऱ्यांना ७ / १2 वर नाव लावून दिले नाही तसेच अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील राजापूरमधील चौविस प्रकल्पग्रस्थ, शेलारवाडी ता.खेड मधील अठरा प्रकल्पग्रस्थ, चिंचवाडी राजापूर मधील 12 प्रकल्पग्रस्थ,तळवट खेड मधील 1 प्रकल्पग्रस्थ यांना अद्याप जमिन मिळालेली नाही व भरलेल्या पैशाचे व्याजही दिलेले नाही. तसेच २००८ पासून निर्वाह भत्ताही मिळालेला नाही तो देण्याचे बैठकीत मान्य करण्यात आले. त्याच बरोबर प्रकल्पग्रस्थांना नोकरीसाठी दाखले देवूनही नोकऱ्या दिल्या नाहीत. त्यांचे नावे दाखले दिले. त्यांची वये ऊलटून गेलेली आहे. त्यांची कुटूंब संख्याही वाढली आहेत. प्रकल्पग्रस्थ हे खऱ्या अर्थाने विकास सैनिक आहेत त्यांना नोकऱ्या देवू शकत नसाल तर त्यांच्या कुटूंबातील अठरा वर्षावरील स्त्री, पुरुषास प्रत्येकी पस्तीस लाख रूपये द्यावेत अशी लेखी मागणी अशोकराव जाधव यांनी शेतकरी कष्टकरी संघटनेच्या वतीने केली आहे. कायद्याने प्रकल्पग्रस्थांना घरबांधणी अनुदान देय आहे ते सुध्दा अद्याप मिळालेले नाही ते त्वरित मिळावे अशी मागणी करून बऱ्याच प्रकल्पग्रस्थांना त्यांनी आपले सर्वस्व देवूनही त्यांना अद्याप दारीद्र रेषेखालील आणि अंतोदय रेशन कार्डही मिळालेली नाहीत. यावर जिल्हातील सर्व प्रकल्पग्रस्थांना दारिद्र रेषेखालील व अंतोदय रेशन कार्ड देण्याचे मान्य करण्यात आले व तसे आदेश संबधित तहसिलदारांना देण्याचे अॅडीशनल कलेक्टर यांनी मान्य केले व चर्चेप्रमाणे शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे ठरले व पुन्हा बैठक बोलविण्याचे मान्य केले.

या बैठकीला श्री अशोकराव जाधव ऊपाध्यक्ष, प्रवक्ते रत्नागिरी जिल्हा काँग्रेस , अध्यक्ष शेतकरी कष्टकरी संघटना महाराष्ट्र राज्य सोबत ऊत्तम गायकवाड शेतकरी कष्टकरी संघटना अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा , शांताराम बल्लाळ प्रकल्पग्रस्थांचे नेते , गोविंद निर्मळ.प्रकल्य ग्रस्थांचे नेते अशोकराव जाधव यांचे सोबत ऊत्तम गायकवाड , शांताराम बल्लाळ , गोविंद निर्मळ व अन्य प्रकल्पग्रस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here