सिंधुदुर्ग- अभिमन्यु वेंगुर्लेकर –्
रत्नागिरी – राजेंद्र माने कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग & टेक्नोलॉजी ,(आंबव देवरूख) मध्ये शिकणारे गणपतीपुळ्यातील हे 3 विद्यार्थी अक्षय प्रभाकर शिखरे, सुरज दिनेश वेद्रे, सुशांत विजय शिंदे यांनी एक आगळीवेगळी कार बनवली आहे. ही नुसती कार नाही तर इलेक्ट्रिक आणि पेडल यांचा अनोखा संगम आहे.छंद माणसाला जगण्यासाठी नवी ऊर्जा देतात. अशाच छंदातुन काही नवनवीन कल्पना सूचत असतात.
या कारला त्यांनी बायो हाइब्रिड (Bio-Hybrid) असे नाव दिले आहे. नावाप्रमानेच ही कार आहे. सद्धयाची परिस्थिति पाहता इलेक्ट्रिक वाहन ही काळाची गरज बनत चालली आहे. याला कारणीभूत पेट्रोल अनं डिजलच्या वाढत्या किमती. ही कार प्रदूषण रोखण्यासोबतच आरोग्याच्या दृष्टीने बनवली आहे. कारण या पेडलच्या वापरामुळे शारीरिक सुदृढ़ता वाढणार आहे. ही कार आकाराने इतर कार्सच्या तुलनेत खुप छोटी आहे.जेणेकरून तिने कमीत कमी जागा व्यापली पाहिजे. ३० ते ३५ km ची माइलेज देणारी ही कार २० kmph च्या वेगाने धावते. ही गाडी ३००ते ३५० kg वजन घेऊन सहज धावु शकते.
संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री मा. रविंद्र माने,कार्यकारी अध्यक्षा नेहा माने,उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, प्राचार्य डॉ. महेश भागवत, प्राध्यापक राहुल वाटेगावंकर(HOD), प्राध्यापक निरंजन मणचेकर, यांचे तसेच मार्गदर्शक प्राध्यापक सुमित सुर्वे आणि सर्व विभाग प्रमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले .हि कार मंगलमूर्ती ॲटो गॅरेज चे मालक दीनेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बनवण्यात आली असून जर लिथियम आयन बॅटरी आणि मोटर जास्त क्षमतेची वापरली तर ही गाड़ी माइलेज, वेग यामध्ये सहज वाढ देवू शकते अस त्यांचे म्हणणे आहे. भविष्यामध्ये सौरऊर्जा व डायनामो (Dynamo) लावून ऑटोचार्जिंग हा फिचर्स सुध्दा देऊ शकतो असा त्याचा मानस आहे आता पर्यंत ही कार बनवण्यासाठी ४५०००/- एवढा खर्च आला अाहे ज्या व्यातिंना या होतकरू युवकाना प्रोसाहन द्यायचे असेल त्यानी खालील नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आले आहे.
1) Akshay Prabhakar Shikhare – 9021085493
2)Sushant Vijay Shinde -9370526318
3)Suraj Dinesh Vedre -9359998390