राज्यात पावसाची संततधार,येत्या 48 तासांत कोकण,मराठवाड्यात मुसळधार

0
108
पावसामुळे भातपीक कापणी लांबणीवर पडणार; पावसाचा जोर वाढल्यास पिकाला धोका, शेतकरी चिंतेत

24 व 25 तारखेला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 

येत्या 48 तासांमध्ये कोकण, मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज रायगड, रत्नागिरी आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचे येलदरी धरण 100 टक्के भरले आहे.येलदरी धरणाचे यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच सर्व 10 गेट उघडण्यात आले आहेत.धरणाच्या उर्ध्वबाजूस असलेल्या खडकपूर्णा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे येलदरी धरणाचे सर्व 10 गेट 0.5 मीटरने उचलण्यात आले आहेत. त्यातून 21 हजार 98.65 क्यूसेकने आणि वीज निर्मितीसाठी 2 हजार 700 क्यूसेक असा एकूण 23 हजार 798.65 क्यूसेकने पूर्णा नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here