हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने पालघर, धुळे,नाशिक या जिल्ह्यांमध्ये पुढच्या तीन ते चार तासांमध्ये पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.या जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसंच या जिल्ह्यातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.या जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.या जिल्ह्यांमध्ये 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 21 ते 24 एप्रिल दरम्यान विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पावसामुळे आणि हवामानातील बदलामुळे काजू, आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. सध्या या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. पाऊस आणि या वातावरणामुळे आंबा आणि काजू बागेचे नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.