राष्ट्रीय: CEAT तर्फे #BeatPlasticPollution उपक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन २०२३ साजरा

0
165
#BeatPlasticPollution , CEAT
CEAT तर्फे #BeatPlasticPollution उपक्रमांद्वारे जागतिक पर्यावरण दिन २०२३ साजरा

मुंबई :प्लॅस्टिक प्रदूषण कमी करणे आणि शाश्वततेला चालना देण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम सुरू करून जागतिक पर्यावरण दिन २०२३ प्रती आपली बांधिलकी जाहीर करताना अग्रगण्य टायर उत्पादक CEAT लिमिटेडला अभिमान वाटत आहे. #BeatPlasticPollution ही या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना सर्वांसाठी स्वच्छ, हरित भविष्य निर्माण करण्यासाठी CEAT च्या सुरू असलेल्या प्रयत्नांशी एकदम सुसंगत आहे. https://sindhudurgsamachar.in/प्रसिद्ध-भारतीय-क्रिकेटप/

कापडी पिशवी उपक्रम: महिलांचे सक्षमीकरण आणि प्लास्टिकचा वापर कमी करणे

CEAT ने त्यांच्या भांडुप प्लांटच्या कम्युनिटी सेंटरमध्ये पर्यावरणपूरक कापडी पिशव्या तयार करण्यासाठी स्थानिक महिला बचत गटांसोबत भागीदारी केली आहे. हा उपक्रम केवळ सहभागी महिलांचे आर्थिक सक्षमीकरणच करतो असे नाही तर शाश्वततेविषयी जागरूकता वाढवतो आणि प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याची गरज अधोरेखित करतो. एकूण ५,००० पिशव्यांचे उत्पादन केले गेले असून ५ जून या जागतिक पर्यावरण दिनी सर्व CEAT प्रकल्पांमध्ये वितरणाची योजना आहे.

पर्यावरण सप्ताह: CEAT प्रकल्पांमध्ये शाश्वततेचा साप्ताहिक उत्सव

कापडी पिशवी उपक्रमाच्या जोडीलाच वेगवेगळ्या ठिकाणच्या CEAT प्रकल्पांमध्ये आठवडाभर चालणारा पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात येईल. त्यामध्ये पर्यावरण जागरूकता वाढवण्यासाठी कर्मचार्‍यांना सहभागी करून घेत डिझाइन केलेले विविध वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहेत.

CEAT कर्मचार्‍यांना “बीट प्लास्टिक पोल्यूशन” या संकल्पनेवर आधारित पर्यावरणीय छायाचित्रण आणि व्हिडिओ स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळेल. संपूर्ण आठवडाभर अधिक जागरूकता वाढवण्यासाठी पर्यावरणाशी संबंधित व्हिडिओ आणि संदेश प्रकल्प कॅन्टीनमध्ये सादर केले जातील.

पर्यावरण सप्ताहानिमित्त नियोजित इतर उपक्रमांमध्ये वृक्षारोपण, स्वाक्षरी मोहीम आणि प्लास्टिक कचरा कमी करण्याच्या महत्त्वावर जोर देण्यासाठी सहभागींना ज्यूट पिशव्यांचे वाटप यांचा समावेश आहे. पर्यावरण प्रश्नमंजुषा स्पर्धा कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाची चाचणी घेईल, तर स्वच्छता मोहिमेद्वारे उत्पादन केंद्राच्या बाहेरील जसे की स्क्रॅप यार्ड, युटीलिटी आणि आजूबाजूच्या परिसरातील क्षेत्रांकडे लक्ष केंद्रित केले जाईल. 

कर्मचार्‍यांना आणखी सहभागी करून घेण्यासाठी जागतिक पर्यावरण सप्ताहाचे बॅज वितरित केले जातील आणि ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा, तसेच पर्यावरण पोस्टर आणि घोषवाक्य स्पर्धा आयोजित केल्या जातील. सभोवतालच्या हिरवाईला प्रोत्साहन देण्यासाठी सीड बॉल बनवण्याची सत्रे आयोजित केली जातील आणि योग्य कचरा व्यवस्थापन पद्धतींचे पालन होत आहे ना याची खात्री करण्यासाठी धोकादायक आणि गैर-धोकादायक कचरा आणि त्याचे विघटन याबद्दल जागरूकता प्रशिक्षण दिले जाईल.

CEAT लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अर्णब बॅनर्जी म्हणाले, “पर्यावरणाची काळजी घेण्याचे आमचे कर्तव्य पार पाडणे ही आमच्या वसुंधरेसाठी आणि भावी पिढ्यांसाठी असलेली आमची बांधिलकी आहे. CEAT मध्ये आम्ही या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या #BeatPlasticPollution संकल्पनेशी सुसंगत प्लास्टिक प्रदूषणाशी लढा देण्यासाठी आणि शाश्वततेला चालना देण्यासाठी समर्पित आहोत. CEAT मध्ये कापडी पिशव्या वापरण्याचा आमचा उपक्रम प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी एक शाश्वत उपाय म्हणून काम करतो. भांडुप प्लांटमधील आमच्या कम्युनिटी सेंटरमध्ये या पिशव्या तयार केल्या जातात आणि तीन स्वयं-सहायता गटाला आधीपासूनच या प्रयत्नाचे फायदे मिळत आहेत. एकदाच वापरता येणार्‍या प्लास्टिक पिशव्यांना पर्याय सादर करत टिकाऊपणाबद्दल जागरुकता वाढवणे आणि व्यक्तींना पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्यास प्रेरित करण्याचा आमचा उद्देश आहे. आपण आपल्या वसुंधरेचे रक्षण करण्याच्या आणि हरित भविष्यासाठी कार्य करण्याच्या प्रतिज्ञेत सहभागी असल्याने जागतिक पर्यावरण दिन २०२३ रोजी आम्ही आमच्या सर्व प्रकल्पांमध्ये या पिशव्या वितरित करू.”

CEAT लिमिटेड पर्यावरणावर आणि ते सेवा देत असलेल्या समुदायांवर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी समर्पित आहे. या उपक्रमांद्वारे, कंपनीचे उद्दिष्ट इतरांना प्लास्टिक प्रदूषणाविरुद्धच्या लढाईत सामील होण्यासाठी आणि अधिक शाश्वत भविष्यासाठी काम करण्यासाठी प्रेरित करण्याचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here