मुबंई- उद्योगपती मुकेश अंबानी यांचे रिलायन्स जिओ लवकरच 4G सिम कार्ड-लेस लॅपटॉप बाजारात आणत आहे. रिलायन्स जिओचा दावा आहे की, हा लॅपटॉप जिओ फोनप्रमाणे भारतीय बाजारपेठेतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू शकेल. रिलायन्स जिओच्या 4G सिम कार्ड लॅपटॉपची किंमत 15,000 रुपये असेल. सर्वसामान्यांचे बजेट लक्षात घेऊन या लॅपटॉपची किंमत निश्चित करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
तीन महिन्यात लॅपटॉप बाजारात येणार
रिलायन्स जिओकडे भारतातील 420 दशलक्ष ग्राहकांसह भारतातील सर्वात मोठे टेलिकॉम नेटवर्क आहे. रॉयटर्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा लॅपटॉप लवकरच देशातील शाळा आणि


