लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. उद्या 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आले आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक सेवा सोडून इतर सर्व गोष्टी दिवसभर बंद राहतील.
राज्यातील मुंबईसह प्रमुख शहरांमधील व्यापाऱ्यांचा या बंदला विरोध दर्शवला आहे.आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. मात्र, उद्या दुकाने सुरु राहतील. आम्ही सरकारला आवाहन करतो की या बंदमध्ये दुकानदारांना खेचू नका. कोरोनानंतर बऱ्याच वेळाने दुकाने सुरु झाली आहेत. सध्या नोकरांचा पगार देणेसुद्धा जिकरीचे झाले आहे असे मुंबई व्यापार संघाचे विरेन शाह यांनी सांगितले.