विविध कल्याणकारी योजनांची माहिती कोंकणाच्या गावपातळीपर्यंत पोहचावी यासाठी लोककला या प्रभावी माध्यमाव्दारे प्रचार व प्रसिध्दीची मोहिम नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

0
193
लोककला

नवी मुंबई, दि.10 :- संपूर्ण कोकण विभागात “दोनवर्षेजनसेवेचीमहाविकासआघाडीची” या टॅगलाईनसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी  या  जिल्हयांमध्ये राबविण्यात येणाऱ्या प्रसिध्दी मोहिमेला दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या शासनातर्फे गेल्या दोन वर्षातील विविध कल्याणकारी योजनांची माहिती कोंकणाच्या खेडोपाड्यांमध्ये, गावपातळीपर्यंत  पोहचावी  यासाठी लोककला या प्रभावी माध्यमाव्दारे प्रचार व प्रसिध्दीची मोहिम संपूर्ण राज्यभर दि. 9 ते 17 मार्च या कालावधीत राबविण्यात येत आहे.

या प्रसिध्दी मोहिमेस कालपासून सुरुवात झाली असून कोकण विभागाच्या जिल्हा माहिती कार्यालयांमार्फत विविध लोककला व पथनाट्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रमुख गावांमध्ये नियोजनबध्द जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

आज ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने ठाणे जिल्हयातील कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, ठाणे येथील येऊर, तहसिलदार कार्यालय कल्याण, कांबा, भिसवोल, मामनोली, घोटसई, आसनगांव, शहापूर तहसिल कार्यालय, खर्डी, कसारा या ठिकाणच्या बाजारपेठा व वर्दळीच्या भागात माहिती व जनसंपर्क महासंचालयाच्या वतीने ठाणे जिल्हयासाठी निवडण्यात आलेल्या कलापथक व लोककलामंचांनी कार्यक्रमांचे सादरी करण केले .

रायगड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने रायगड जिल्हयातील म्हसळा, श्रीवर्धन, दिवेआगार, बोर्ली, भरडखोल, शिवाजी चौक, जीवना, अलिबाग येथील पीएनपी विद्यालय, रोह्यातील वायशेत चवडीनाका, कन्याशाळा या ठिकाणच्या बाजारपेठा आणि वर्दळीच्या ठिकाणी  रायगड जिल्हयासाठी निवडण्यात आलेल्या कलापथक व लोककलामंचांनी कार्यक्रमांचे सादरीकरण केले .

रत्नागिरी  जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने रत्नागिरी  जिल्हयातील खेड तालुक्यातील घाणेखुंट, आवाशी, भरणेनाका, गांधीचौके, रत्नागिरीतील कुवारबांव बजारपेठ, निवळी बाजारपेठ, जाकादेवी बाजारपेठ, गणपतीपुळे, साखरतर बाजारपेठ, राजापूर तालुक्यातील राजापूर बाजारपेठ, बसस्थानक, ओणी बाजारपेठ, हातिवले या ठिकाणच्या वर्दळीच्या ठिकाणी  रत्नागिरी  जिल्हयासाठी निवडण्यात आलेल्या कलापथक व लोककलामंचांनी कार्यक्रमांचे सादरी करण केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here