वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 14 मि.मी. पाऊस

0
119
मुसळधार पाऊस,
शनिवारपर्यंत अतिमुसळधार पाऊस कायम

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 14 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 3 पूर्णांक 9 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 942.96 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 2 (1086), सावंतवाडी – 7 (1117.7), वेंगुर्ला – 3.2(746), कुडाळ -2 (811), मालवण – 0 (899), कणकवली – 2(1048), देवगड – 1(824), वैभववाडी – 14(1012), असा पाऊस झाला आहे.

तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 17.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 349.1640 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.05 टक्के भरले आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 59.1090, अरुणा – 29.2373, कोर्ले- सातंडी – 25.4740.
लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 2.0940, नाधवडे – 3.4083, ओटाव – 1.3215, देंदोनवाडी – 0.4347, तरंदळे – 1.0850, आडेली – 1.1860, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 1.8130, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 1.2580, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी – डिगस – 0.6960, दाभाचीवाडी – 1.2500, पावशी – 3.0300, शिरवल – 3.4690, पुळास – 1.5080, वाफोली – 1.7700, कारिवडे – 0.8740, धामापूर – 1.7910, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 0.8080, ओझरम – 1.8190, पोईप – 0.7610, शिरगाव – 0.5880, तिथवली – 1.0800, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here