काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते.एकनाथ गायकवाड हे ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.
काँग्रेसमध्ये असतानाच त्यांनी दलित चळवळीशीही ते जोडले गेलेले होते. यामुळे दलित चळवळीतील कार्यकर्तेही त्यांना मानत होते.