प्रतिनिधी पांडुशेठ साटम
आ.वैभव नाईक यांनी केले अभिनंदन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार, खासदार विनायक राऊत, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना आचरा विभागप्रमुख पदी समीर लब्दे, आचरा समन्वयक पदी चंद्रकांत गोलतकर, व देवबाग विभाग समन्वयक पदी भगवान लुडबे यांची निवड केली आहे. आज त्यांना निवडीचे पत्र देऊन मालवण शिवसेना शाखा येथे आमदार वैभव नाईक यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, मालवण सरपंच संघटना अध्यक्ष नंदू गावडे, भाई कासवकर,किरण वाळके, राजू परब, किसन मांजरेकर, अनिल गावकर, आदी उपस्थित होते.