सहायक प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या ३७० रिक्त पद भरतीला मान्यता – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

0
97

राज्य सरकारने प्राध्यापक भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्या महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी दिली.प्राध्यापक भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करा, अशी मागणी आंदोलनदेखील करण्यात आले होते.ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे होणार असून यशस्वी उमेदवारांची नियुक्ती सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात करण्यात येणार आहे.

शासकीय व अनुदानित महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर पदांसाठी घड्याळी तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या कनिष्ठ अधिव्याख्यात्यांच्या मानधनाच्या दरात सर्वसाधारण २५ टक्के एवढी भरीव वाढ करण्यात आली आहे. २३ ऑक्टोबर १९९२ ते दि. ३ एप्रिल २००० या कालावधीत नियुक्त बिगर नेट/सेट अध्यापकांना त्यांच्या मूळ नियुक्तीचा दिनांक ग्राह्य धरून तत्कालीन प्रचलित धोरणानुसार जुनी सेवानिवृत्ती वेतन अनुज्ञेय करण्याबाबतचा २९ ऑक्टोबर २०२१ रोजी निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे सर्वसाधारण ४,१३३ अध्यापकांना जुन्या सेवानिवृत्ती योजनेचा लाभ होणार असल्याचेही सामंत यांनी या वेळी सांगितले.एकूण २०८८ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here