देशभरात कोरोनाने हौदोस घातला आहे.या पार्श्वभूमीवर देशात सगळीकडेच कोरोनाच्या लसीकरणावर भर दिला जात आहे. सिंधुदुर्गातही लसीकरणाची मोहीम चालू आहे.पण येथील उप जिल्हा रुग्णालयात कोविड लस संपल्याचे सांगण्यात येत आहे.
या रुग्णालयाला ४लाख ३८० एवढ्या लास देण्यात आल्या होत्या पण आता लसीचा साठा संपल्याने लसीकरण बंद केल्याचे सांगण्यात आल्याने नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे.आतापर्यंत फ्रॉन्टलाईन वर्करसहित जेष्ठ नागरिकांनाही कोविडची लस देण्यात आलेली आहे. लसीकरण बंदचा बोर्ड रुग्णालयाबाहेर लावण्यात आला आहे. तसेच लस उपलब्ध होताच पुन्हा लसीकरण चालू होणार असल्याची माहिती रुग्णालयाच्या अधिकृत डॉक्टरांकडून दिली जात आहे