सिंधुदुर्ग- कृषीपंप वीज जोडणीमध्ये थकीत वीज बिल कोरे करण्याची संधी

0
99
कृषीपंप वीज जोडणी

सिंधुदुर्ग-

केंद्र शासनाने पर्यटन विकसीत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा दत्तक घेतल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील मुख्य शासकीय सोहळ्यात सांगितले. केंद्र शासनाने पर्यटन विकसीत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा दत्तक घ्यावे अशी मागणी राज्य शासनाने केली होती राज्य शासनाने पर्यटन विकसीत करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाच जिल्ह्यांच्या बाबत मागणी केली होती. त्यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटन विकसीत करण्यासाठी केंद्र शासनाने दत्तक जिल्हा घोषीत केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा या पूर्वीच पर्यटन जिल्हा जाहीर झाला आहे. पर्यटनामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. त्यासाठी निश्चितच चांगल्या पायाभूत सुविधा केल्या जातील, असेही ते म्हणाले.

त्यानुसार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी राज्य शासनाने कृषीपंप वीज जोडणी धोरण 2020 जाहीर केले आहे. या धोरणामध्ये वीज बिलाच्या व्याज आणि विलंब आकारात 66 टक्क्यांपर्यंत सूट देऊन त्यांना त्यांचे थकीत वीज बील कोरे करण्याची संधी उपलब्ध केली आहे. या संधीचा लाभ 31 मार्च 2022 पूर्वी 66 टक्क्यांपर्यंत सवलत घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री श्री. सामंत यांनी केले.या योजनेत कृषीपंप ग्राहकांचा सहभाग महत्वाचा आहे

वीज बिलाच्या वसूल झालेल्या रकमेतून 33 टक्के ग्रामपंचायत व 33 टक्के जिल्हा पातळीवर हा निधी पायाभूत सुविधेसाठी वापर करता येणार आहे. तरी कृषीपंप ग्राहकांनी या धोरणाचा लाभ घेऊन आपले थकीत वीज बील कोरे करावे असे आवाहन ही त्यांनी केले. यावेळी महात्मा ज्योतीराव फुले जन पोलीस कवायत मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यास जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी दतात्रय भडकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, राजेंद्र पराडकर, संदेश पारकर आदी उपस्थित होते.

* सोबत फोटो जोडला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here