प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर
ओरोस – भाजप आमदार नितेश राणे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर दोन दिवसांनी आज सुनावणी पूर्ण झाली आहे.
मात्र, निकाल देण्यासाठी वेळ हवा असे सांगत न्यायाधीश एस व्ही हांडे निकाल राखून ठेवला आहे. उद्या दिवसभरात केव्हाही हा निकाल जाहीर केला जाईल असे सांगितले. त्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यानंतर तिसऱ्या दिवशीही जामीन मिळणार की नाही? याचे उत्तर मिळालेले नाही. त्यासाठी अजून एक दिवस वाट पहावी लागणार आहे.