पुणे– महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च – एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) लेखी परीक्षा दि. 4 मार्च 2022 ते दि. 7 एप्रिल 2022 व माध्यमिक प्रमाणपत्र ( 10 वी) ची लेखी परीक्षा दि. 15 मार्च 2022 ते दि. 4 एप्रिल 2022 या कालावधीत आयोजित केली आहे.
परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्यासाठी राज्यमंडळ स्तरावर समुपदेशकांची नियुक्त करण्यात आली आहे. त्याचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.
1)8432592358, 2)7249005260, 3)7387400970, 4)9307567330, 5)8975478247, 6)7822094261, 7)9579159106, 8)9923042268, 9)7418119156, 10)8956966152. हे समुपदेशक परीक्षा कालावधीत सकाळी 8 ते रात्री 8 या कालावधीत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क आवश्यकते समुपदेशन करतील.
मात्र विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंबंधित प्रश्न इत्यादींबाबत समुपदेशकांना विचारणा करून नये, असे डॉ. अशोक भोसले, सचिव राज्यमंडळ, पुणे हे कळवितात.