सिंधुदुर्ग: प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या दोषी मुख्याध्यापक व शिक्षकांवर कारवाईची युवासेनेची मागणी

0
191
सुजित जाधव

नवोदय विद्यालयात परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेमुळे युवासेना आक्रमक

गेली काही वर्षे सिंधुदुर्ग जिल्हयातील नवोदय विद्यालयात जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन सिंधुदुर्ग मधील विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे. यासंदर्भात जिल्हापरिषद प्रशासनाने देखील दुर्लक्ष केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक याला कारणीभूत आहेत. अनेक शिक्षकांना याची माहिती असूनही आजपर्यँत याची वाच्यता करण्यात आली नाही. असा आरोप युवासेनेच्या वतीने सुजित जाधव यांनी केला आहे.

जिल्हा प्रशासनाने शिक्षकांना ज्ञानार्जनाऐवजी दुसरे काम दिल्यास. अथवा वेतन, शासकीय लाभ अशा विविध मागण्यांसाठी वेळोवेळी शिक्षक आंदोलन करत असतात. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने हे शिक्षक आवाज का उठवत नाहीत? असा सवाल सुजित जाधव यांनी केला आहे. सिंधुदुर्ग येथील नवोदय विद्यालयात ५० विद्यार्थी क्षमता असून सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण शासनामार्फत दिले जाते. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक परजिल्ह्यातील विध्यार्थ्यांना नवोदय विद्यालयातील प्रवेश प्रक्रियेसाठी गैरमार्गाने सहकार्य करतात. परजिल्ह्यातील विद्यार्थी त्यांचे पालक लाखो रुपये खर्च करून अकॅडमी मध्ये शिक्षण घेऊन नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होतात परिणामी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश मिळत नाही. याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक जबाबदार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी हे मुख्याध्यापक व शिक्षक सोयीस्कर रित्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामागे या शिक्षकांचा वैयक्तिक स्वार्थ दडला आहे का? असा प्रश्न सिंधुदुर्ग वासियांना पडला आहे. त्यामुळे या दोषी शिक्षकांवर कारवाईची मागणी युवासेनेकडून करण्यात आली आहे.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here