सिंधुदुर्ग: मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती उत्साहात

0
191

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत किल्ले सिंधुदुर्गवर शिवसैनिकांनी काढली मिरवणूक

प्रतिनिधी – पांडुशेठ साठम

मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात शिवजयंती उत्सव कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी किल्ले परिसरात ढोल ताशाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत मिरवणूक काढण्यात आली. मूर्तीस आ.वैभव नाईक यांनी जिरेटोप व पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, आपल्या पाठपुराव्यामुळे शिवराजेश्वर मंदिर नूतनीकरणाचे काम मंजूर होऊन आता ते पूर्णत्वास जात आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर पाण्याचा प्रश्न होता त्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधल्यानंतर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून १ कोटी ६० लाख रु. चा निधी मंजूर झाला आहे. पुढच्या शिवजयंतीच्या अगोदर हे काम पूर्ण केले जाणार आहे अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी देत. शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. सिंधुदुर्ग किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव असलेले हे शिवराजेश्वर मंदिर शिवजयंती निमित्त आकर्षक फुलांची आरास करून सजविण्यात आले होते. याप्रसंगी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी किल्ले परिसर शिवसैनिकांनी दुमदुमून सोडला. त्यानंतर मालवण शिवसेना शाखेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून शिवजयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, महेश कांदळगावकर, मंदार केणी, यतीन खोत, शहरप्रमुख बाबी जोगी, पंकज सादये, अमित भोगले, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे , सेजल परब, दीपा शिंदे, श्वेता सावंत, पूनम चव्हाण, आकांक्षा शिरपुटे, मंदार ओरोसकर, प्रसाद आडवणकर, दीपक देसाई, सन्मेष परब, समीर लब्दे, भाऊ परब, नारायण कुबल, यशवंत गावकर, महेंद्र म्हाडगूत, किल्ले होडी प्रवाशी संघटनेचे स्वप्नील आचरेकर, मंगेश सावंत, बाळा तारी, किसन मांजरेकर, किशोर गावकर, राजेश गावकर, बाळू नाटेकर, अक्षय रेवंडकर, श्रेयस रेवंडकर,भगवान लुडबे, शिल्पा खोत, नंदा सारंग, सुप्रिया मंडये अंजना सामंत,आदींसह किल्ला रहिवाशी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here