सिंधुदुर्ग: मुंबई-गोवा महामार्ग उद्यापासून महिनाभर बंद!

0
230
परशुराम घाटाच्या माथ्याशी व पायथ्यशी असलेल्या घरांचे लवकरात लवकर पुनर्वसन करा-सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

चिपळूण- चिपळूण जवळील परशुराम घाटातील महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी उद्या म्हणजेच 22 एप्रिलपासून महिनाभरासाठी दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येणार आहे.रशुराम घाटात महिनाभर काम सुरु राहणार असल्याने वाहतुकीची अडचण लक्षात घेत पर्यायी मार्गासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत वाहतूककोंडी टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

परशुराम घाटातील रुंदीकरणाचे काम 20 एप्रिलऐवजी 22 एप्रिल 2022 रोजी सुरु होणार आहे. जवळपास महिनाभर हे काम सुरु राहणार असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. या बैठकीत वाहतूककोंडी टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार लहान वाहने, राज्य परिवहन मंडळाच्या बसेस आणि लोटे एमआयडीसीतील बसेसची वाहतूक लोटे-चीरणी-आंबडस मार्गे चिपळूण अशी सुरु ठेवण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग वाळवताना वाहतूककोंडी होऊ नये यासाठी चार ठिकाणी पोलिस चौकी उभारण्यासंदर्भात देखील निर्णय घेण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here