प्रतिनिधी: वैभववाडी ( मंदार चोरगे)
मासिक पाळी व्यवस्थापना संबंधित मुलींना देण्यात आली माहिती; ‘अस्मिता‘ या माहिती पुस्तकाचे करण्यात आले वितरण
वैभववाडी – वैभववाडी तालुक्यातील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय आचिर्णे येथे दिनांक 23 मार्च 2022 रोजी ‘अस्मिता’ हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्या वतीने राबविण्यात आला .रोटरी इंडिया च्या वतीने गवर्नर गौरेश धोंड, शरद पै, प्रतिभा धोंड , उत्कर्षा पाटील, शशिकांत चव्हाण, राजेश घाटवळ, प्रणय तेली यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अस्मिता’ हा प्रकल्प राबविला जात आहे. यासाठी रोटरी क्लब ऑफ बिबेवाडी पुणे , जी टी पी एल लिमिटेड व सुशील विद्या रत्नागिरी , राजेश शेट्टी बेळगाव यांचे सहकार्य लाभले आहे.
मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनाची माहिती प्रत्येक विद्यार्थिनी पर्यंत पोचायला हवी , रोटरी क्लबच्या वतीने याहीपुढे असे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना मदत केली जाईल असे मत रोटरी क्लबचे प्रेसिडेंट संतोष टक्के यांनी यावेळी व्यक्त केले. प्रत्यक्ष मुलींशी चर्चा करण्याच्या कार्यक्रमा वेळी डॉक्टर दीपा पाटील, स्नेहल रावराणे आणि राणे मॅडम यांनी विद्यार्थिनीशी चर्चा करून मासिकपाळी स्वच्छता व्यवस्थापनाची माहिती दिली. हा कार्यक्रम चर्चात्मक करताना अनेक विद्यार्थिनींनी आपले प्रश्नांचे निराकरण डॉक्टर दीपा पाटील यांच्याकडून करून घेतले . गरजू विद्यार्थिनीना चार महिने पुरतील असे सॅनिटरी पॅड रोटरी क्लब च्या वतीने देण्यात आले . त्याचबरोबर अस्मिता हे रोटरी क्लब ने प्रसिद्ध केलेले माहिती पुस्तक मुलींना वाचायला देण्यात आले. आणि विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी पाच पुस्तके मुख्याध्यापक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली . विद्यार्थिनीना बचावासाठी पेपर स्प्रे चा वापर कसा करावा याचीही माहिती यावेळी देण्यात आली . रोटरी क्लबने तयार केलेल्या मासिकपाळी व्यवस्थापनाचे आणि मासिक पाळी विषयी गैरसमज दूर करण्याविषयीची चित्रफिती यावेळी विद्यार्थिनींना दाखवण्यात आली. या विद्यालयातील पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मासिक पाळी संबंधीची माहिती जाणून घेतली. हा प्रकल्प राबवण्यासाठी आपल्या विद्यालयाची निवड केल्याबद्दल अचिर्णे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकानी रोटरी क्लब चे आभार मानले. रोटरी म्हणजे काय, रोटरीचे उपक्रम कसे चालतात ,रोटरी तळागाळातल्या लोकांपर्यंत कशी पोचते याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनाची माहिती आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे दिल्याबद्दल आणि सॅनिटरी पॅड पुरवल्याबद्दल विद्यार्थिनींच्या वतीने रोटरी क्लब ऑफ वैभववाडी चे आभार मानले . सरस्वती पूजन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले . या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुळसकर सर यांनी केले तर आभार संजय रावराणे यांनी मानले.यावेळी रोटरी क्लब ऑफ वैभववाडी चे अध्यक्ष श्री संतोष टक्के, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, रोटरी क्लबचे सेक्रेटरी संजय रावराणे, खजिनदार प्रशांत गुळेकर, बंडा पाटील, डॉक्टर दीपा पाटील, स्नेहल रावराणे, मंगेश कदम , विद्याधर सावंत, मुकुंद रावराणे, माध्यमिक विद्यालयाच्या राणे मॅडम, तुळसकर सर व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.