सिंधुदुर्ग: वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही नवीन निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत.यामध्ये बंदिस्त सभागृहामध्ये किंवा मोकळ्या जागेत लग्नसमारंभासाठी त्या त्या तालुक्यातील तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना परवानगी देण्याबाबतचे अधिकार देण्यात आले आहेत.लग्न समारंभासाठी
बंदिस्त अथवा मोकळ्या जागेत तसेच इतर सामाजिक, सांस्कृतिक राजकीय किंवा धार्मिक कार्ये आणि मेळाव्याच्या बाबतीतही जास्तीत जास्त 50 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे.
.
अंतिम संस्कारासाठी 20 व्यक्तींना परवानगी असणार आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी लागू केले आहेत . तसेच बंदिस्त सभागृहासाठी किंवा मोकळ्या जागेत इतर सामाजिक, सांस्कृतीक, राजकीय किंवा धार्मिक कार्ये व मेळाव्याच्याबाबतीत त्या त्या उपविभागातील उपविभागीय अधिकारी यांना निर्णय घेण्याचे अधिकार शासनाने दिले आहेत
जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळत स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करत समाजाचेही रक्षण करण्यास हातभार लावावा असे आवाहन करण्यात आले आहे.