सिंधुदुर्ग – वेंगुर्ला येथे अंमली पदार्थ विरोधात जनजागृती

0
47

वेंगुर्ला प्रतिनिधी-

अंमली पदार्थ (ड्रग्ज) विरोधी जनजागृती समितीच्यावतीने वेंगुर्ला शाळा नं.४ च्या सहकार्याने रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

दिवसेंदिवस अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडत चाललेल्या युवा पिढीला त्यातून बाहेर काढण्यासाठी वेंगुर्ला अंमली पदार्थ विरोधी जनजागृती समितीच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत समितीचे जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, सत्यवान साटेलकर, प्रार्थना हळदणकर, जयराम वायंगणकर, पुंडलिक हळदणकर, श्री.म्हालटकर, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, मुख्याध्यापक संध्या बेहेरे, शिक्षक संतोष परब, राजू वजराटकर, नाईक यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते.   दरम्यान तालुक्यातील अन्य शाळा, महाविद्यालय या ठिकाणीही अंमली पदार्थ विरोधी जनजागृती पर व्याख्यान, शपथ, चर्चासत्र असे कार्यक्रम घेण्यात आले.

फोटोओळी – अंमली पदार्थ विरोधात विद्यार्थ्यांच्या सहभागाने जनजागृती रॅली काढण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here