सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरगाव येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी मोफत वाचनालय सुरुवात करण्यात आली आहे. शिरगावमधील लोकभवन मध्ये हे मोफत वाचनालय सुरु करण्यात आले आहे. या वाचनालयाचे उदघाटन दिनांक 28 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. यावेळी श्री. सहदेव लोकेसाहेब ,मा. रवी जोगल सर, विजय कदम सर,अत्तार सर, जयेंद्र चव्हाण सर, यांच्या उपस्थितीत या मोफत लायब्ररीचे उदघाटन करण्यात आले.सिंधुदुर्गातील मुलांना स्पेर्धा परीक्षांची (जसे UPSC, MPSC, IAS, IPS ) तयारी करण्यासाठी ‘हे वाचनालय सुरु करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी यासाठी मोफत वाचनालय हे सुरु करण्यात आले आहे-
त्याशिवाय, शिरगांव हायस्कूल मधील 11वी,12 वी च्या गरीब मुलांना कै.सुगंधा लोके स्मरणार्थ शैक्षणिक स्पॉन्सरशिप देउन त्यांच्या शिक्षणlचा खर्च उचलण्यात आला आहे. सिंधुदुर्गातील,गावातील मुलांनी खूप शिक्षण घेउन आपल्या समाजाचे, गावाचे नाव रोशन करावे हिच सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली