सिंधुदुर्ग : सूडबुद्धीने केलेल्या कारवाईला शिवसेना डगमगणार नाही- खा. अनिल देसाई

0
177

जोमाने काम करून शिवसेनेची ताकद दाखवून द्या-विनायक राऊत.

दिलेले वचन पूर्ण करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले – उदय सामंत

आज भाजप सुपात आहे उद्या जात्यात येईल-आ.वैभव नाईक

कुडाळ येथे शिवसंपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ- उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आलेली नैसर्गिक वादळे , आपत्ती त्याचबरोबर कोरोना महामारीचे संकट याला उद्धवजींनी धैर्याने सामोरे जात या महाभयंकर संकटांवर मात केली. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राज्यात कधीही न झालेली विकास कामे मार्गी लावली जात आहेत. लोकांना सोयी सुविधा पुरविल्या जात आहेत. तसेच संघटना वाढीसाठी उद्धवजींच्या आदेशानुसार शिवसंपर्क अभियान महाराष्ट्रभर राबवले जात आहे. शिवसेनेची संघटना समृद्ध आहे.जिल्हाप्रमुख ते शाखाप्रमुख बुथ प्रमुख पर्यंत सर्वांशी संपर्क ठेवून मतदारांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात आले. या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शिवसेना पक्ष भाजपचा मोठा विरोधक असल्यानेच भाजपचे लोक सूडबुद्धीने शिवसेनेच्या नेत्यांवर ईडीची कारवाई करत आहेत.परंतु अशाने शिवसेना डगमगणार नाही. सत्ता हि येत जात असते सत्तेची हवा डोक्यात घालून चालत नाही उद्या केंद्रात आमची सत्ता आली तरी सूडबुद्धीने कारवाई करणार नाही. आमदार वैभव नाईक यांनी मतदारसंघात शिवसेना संघटनेची चांगली बांधणी केली आहे. शिवसेना नेहमीच खळखळणारा प्रवाह आहे. निष्ठेने काम करत राहणार त्याच्या पाशी पदे चालून येणार असे प्रतिपादन खासदार अनिल देसाई यांनी केले.

शिवसंपर्क अभियान अंतर्गत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचा मेळावा आज सिंधुदुर्ग जिल्हा शिवसंपर्क अभियान प्रमुख, खासदार अनिल देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ शहरातील सिद्धिविनायक हॉल येथे संपन्न झाला. यावेळी प्रथमतः दीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच कुडाळ मालवण शिवसेनेच्या वतीने खा. अनिल देसाई यांना पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.
यावेळी शिवसेना सचिव,खासदार विनायक राऊत, पालकमंत्री ना. उदय सामंत, माजी राज्यमंत्री आ.दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष समन्वयक प्रदीप बोरकर,शिवसेना जिल्हाप्रमुख,कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्ष संदेश पारकर, शिवसेना नेते सतीश सावंत, ,महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,कुडाळ संपर्क प्रमुख बाळा म्हाडगुत,माजी जि. प. गटनेते नागेंद्र परब, माजी जी. प. अध्यक्ष विकास कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, जयभारत पालव, संतोष शिरसाट, अतुल बंगे, महेश कांदळगावकर, मंदार केणी, संजय भोगटे, रुपेश पावसकर, सचिन काळप, उदय मांजरेकर, महेश देसाई ,ऍड. हर्षद गावडे, गुरु गडकर, महिला आघाडीच्या मथुरा राऊळ, स्नेहा दळवी,श्रेया परब,पूनम चव्हाण,श्वेता सावंत,सेजल परब, दीपा शिंदे,श्रेया गावंडे,श्रुती वर्दम,ज्योती जळवी,सई काळप, शीला गिरकर, योगेश धुरी, मंदार गावडे व शिवसेना ,युवासेना, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

जोमाने काम करून शिवसेनेची ताकद दाखवून द्या-विनायक राऊत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना अधिक जोमाने वाढत आहे. अनेक निवडणुकीत शिवसेनेला यश मिळाले आहे.लोक भाजपला नाकारत आहेत. मात्र यावर समाधान न मानता येणाऱ्या जिल्हा परिषद. पंचायत समिती निवडणुकांमध्ये आपल्याला शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. त्यादृष्टीने एकसंघ होऊन एकजुटीने पक्ष संघटना वाढीचे काम करा.बाळासाहेबांनी दिलेल्या विचारानुसार उद्धवजी ठाकरे यांना अपेक्षित असलेले काम सर्व शिवसैनिकांनी करणे गरजेचे आहे.प्रत्येक शिवसैनिकांच्या पाठीशी शिवसेना पक्ष खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे जोमाने काम करून शिवसेनेची ताकद दाखवून द्या. असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केले.

दिलेले वचन पूर्ण करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले – उदय सामंत

सिंधुदुर्ग जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे सर्वसामान्य शिवसैनिकाला ताकद देण्याचे कर्तव्य शिवसेना पार पाडत आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सिंधुदुर्गवर विशेष प्रेम दाखवत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेडिकल कॉलेज, चिपी विमानतळ सुरु केले. सिंधूरत्न योजना अस्तित्वात आणून निधी मंजूर केला.मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी हि तीन आश्वासने दिली होती ती आश्वासने उद्धवजींनी पूर्ण केली आहेत. याआधीही 25 वर्षे ज्यांनी सिंधुदुर्गात राजकारण केले सत्ता उपभोगली त्यांना सिंधुदुर्गमधील महत्त्वाचे प्रश्न सोडवणे शक्य झाले नाही ते उद्धवजी ठाकरे यांनी कोरोनाचा कालावधी असतानाही सोडून दाखवले. दिलेले वचन पूर्ण करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत. याचा मला अभिमान आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची देखील जबाबदारी आहे की पुढील निवडणुकांमध्ये शिवसेनेचा विजय झाला पाहिजे त्यासाठी आपण मेहनत घेतली पाहिजे एकजुटीने काम केल्यास येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकेल. असे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी सांगितले.

आज भाजप सुपात आहे उद्या जात्यात येईल- आ. वैभव नाईक

भाजपचे १ पोस्टर वाचले प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर स्वतः परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चित्र मात्र वेगळेच आहे. प्रथम नारायण राणे भाजप द्वितीय निलेश राणे भाजप, तृतीय नितेश राणे भाजप म्हणजे सगळे राणे आधी नंतर भाजप अशी सिंधुदुर्ग भाजपची स्थिती आहे. राणेंना पक्षात घेतल्यानंतर काँग्रेसची अवस्था कशी झाली हे सर्वानी पहिले तशीच अवस्था येणाऱ्या काळात भाजपची होणार आहे. आज भाजप सुपात आहे उद्या जात्यात येईल.ठाकरे सरकारकडून तौकते वादळ ग्रस्तांना ४० कोटीची थेट मदत मिळाली. मात्र केंद्र सरकार कडून एकही रुपया मिळाला नाही. नारायण राणेंनी केंद्रसरकारकडून एक रुपयाचा निधी जरी आणला असेल तर आणलेला निधी अथवा रोजगार जाहीर करावा प्रत्येक निवडणुकीत भाजपने दबावाचे राजकारण केले आहे. कुडाळ देवगड नगरपंचायत निवडुकीत भाजपला लोकांनी नाकारले आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत हे दबावाचे राजकारण चालू देणार नाही. सिधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मेडिकल कॉलेज मंजूर करून ते प्रत्यक्षात सुरु केले आहे. कुडाळ मध्ये महिलांसाठी महिला रुग्णलय सुरु झाले. चिपी विमानतळ सुरु झाले. कुडाळ मालवण मधील रखडलेल्या रस्त्यांची कामे सुरु करण्यात आली आहेत.आपल्यावर कोण टीका करतंय याची विचार न करता माझ्या शिवसैनिकाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी उद्धवजी ठाकरे झटत आहेत. अनेक सामान्य शिवसैनिकांना त्यांनी विविध पदे दिली त्यामुळे त्यापदाला आपण न्याय दिला पाहिजे. पक्षाचा जो आदेश येईल तो आदेश सर्वांनी पाळला पाहिजे असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले. यावेळी अरुण दुधवडकर, प्रदीप बोरकर, सतीश सावंत,संदेश पारकर, संजय पडते जान्हवी सावंत आदींनी आपले विचार मांडत शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

        
         
           

               

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here