सिंधुदुर्ग:एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उद्या जिल्हा प्रशासनाच्यावतीने मार्गदर्शन- जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

0
180

सिंधुदुर्ग: एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उद्या जिल्हा प्रशासनाच्यावतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. परीक्षेच्या स्वरुपापासून विविध शंकांचे निरसन यात होणार आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या या संकल्पनेतून सुरू झालेल्या प्रेरणा उपक्रमाअंतर्गत उद्या दुसरे ऑनलाईन मार्गदर्शन सत्र होत आहे.

मंगळवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत हे मार्गदर्शन फेसबुक लाईव्हद्वारे https://www.facebook.com/Collector-Office-Sindhudurg-01061044850492 ऑनलाईन होत आहे. उद्या होणाऱ्या या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, परीविक्षाधिन उपजिल्हाधिकारी तथा देवगडचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, परीविक्षाधिन तहसीलदार तथा परीचलन अधिकारी सहभागी होणार आहेत. एमपीएससी परीक्षेची तयारी कशी करावी, आत्मविश्वासाने मुलाखतीला कसे सामोरे जावे, येणाऱ्या अडचणींवर मार्ग कसा काढावा, या बरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्न, शंका यांचे निरसन केले जाणार आहे.

यापूर्वी युपीएससी विषयी मार्गदर्शन सत्र संपन्न झाले आहे. त्यावेळी जिल्ह्यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी एमपीएससीसाठीही अशा स्वरुपाचे सत्र आयोजित करण्याविषयी विचारणा केली होती. त्याअनुषंगाने उद्या एमपीएससी परीक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून, विद्यार्थी-विद्यार्थिंनींनी याचा लाभ घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here