सलग चोथ्या दिवशी विमान आलेच नाही;गेल्या १५ दिवसात ८ वेळा विमानसेवा रद्द
वेंगुर्ला प्रतिनिधी
जिल्ह्यातील चिपी विमानतळाला खराब हवामानाचा वारोवार फटका बसत आहे. गेल्या १५ दिवसात ८ वेळा विमानसेवा बंद ठेवण्यात आली. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता नाही. लँडिंग आणि टेक ऑफसाठी किमान 5000 M दृश्यमानता आवश्यक आहे असे कारणं एअर लाईन्स कडून देण्यात येतेय. . . .
कोकणात पावसाळ्यात हवेतील दृश्यमता कमी होत असल्याने वारोवार विमानसेवा बंद ठेवण्यात येत आहेत. आजही विमानसेवा बंद असून गेले चार दिवस सलग ही विमानसेवा बंद आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग (चिपी) ते मुंबई आणि मुंबई ते सिंधुदुर्ग (चिपी) विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.विशेष म्हणजे प्रवाशी आसन संख्या समाधानकारक असताना केवळ खराब हवामान याचे कारण दाखवून विमान सेवा बंद होतेय त्यामुळे मुबईतुन तळ कोकणात व तळ कोकणातीन मुबईत जाणाऱ्या प्रवाशांना नाहक आर्थिक व मानसिक भुर्दंड पडतोय परिणामी चिपी विमानतळ येथील विमानसेवा रद्द झाल्याने गोवा येथून महाग तिकिटाने तेच प्रवाशी याना जावे लागते तर काही जण रेल्वेने जाणे पसंद करत आहेत. या दररोजच्या एअर लाईन्सच्या कारणामुळे विमानाच्या प्रवाशी सेवेवर परिमाण होऊ शकतो त्यामुळे खासदार व केंद्रीय मंत्री यांनी या समस्येकडे विशेष लक्ष घालावे व प्रवाशी याची गैरसोय दूर करावी व विमान सेवा पावसाळ्यात ही पूर्ववत कशी देत येईल व अन्य खाजगी विमाने कशी उतरतील याकडे विशेष लक्ष द्यावें अशी मागणी प्रवाशी वर्गातून जोर धरत आहे