मराठी चित्रपटसृष्टीतली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आपल्या वाढदिवशी लग्नबंधनात अडकली आहे. अप्सरा म्हणून नावाजलेल्या या अभिनेत्रीचा 18 मे रोजी 33 वा वाढदिवस होता. या वाढदिवसाचे खास औचित्य साधत तिने कुणाल बेनोडेकरसोबत लग्नगाठ बांधली आहे.
कुणाल लंडनचा असून तो कामानिमित्त दुबईत वास्तव्यास असतो. त्याचे शिक्षण लंडनमधल्या ‘मर्चंट्स टेलर स्कूल’मध्ये झाले. त्यानंतर ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स’मधून त्याने उच्च शिक्षण घेतले आहे.
कुणाल बरोबर लग्नाच्या तयारीसाठी मी मार्चमध्ये शूटिंग संपवून दुबईला आले, आणि भारतात दुसरी लाट आली. मी पुन्हा एकदा दुबईत अडकले पण लग्न बंधनात ही! असे तिने सोहळा मीडियावर आपल्या लग्नाची पोस्ट टाकताना म्हंटले आहे. त्यांचे लग्न जुलै महिन्यात युके मध्ये होणार होते.पण पुढील सगळंच कोरोनामुळे अनिश्चित असल्याने त्यांनी लग्नाची तारीख प्रेपॉन्ड करण्याचा निर्णय घेतला आणि अवघ्या दोन तासात लग्नाची तयारी करून लग्नही केले.कुणालचे आई-वडील लंडनमधून तर सोनालीच्या आई-वडिलांनी भारतातून त्यांना आशीर्वाद दिले