अकरावी प्रवेश परीक्षा (CET) प्रवेश फॉर्ममधील चुकिची माहिती दुरुस्त करता येणार

0
83

प्रवेश परीक्षा पोर्टल मध्ये Edit Options चा समावेश

०२ऑगस्ट रात्री १२ पर्यंतच विद्यार्थ्यांना ही सुविधा असणार उपलब्ध

मंदार चोरगे /वैभववाडी


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एस एस सी परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर काही दिवसांतच अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सी.ई.टी) फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळामार्फत संगणक प्रणालीमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. काही तांत्रिक कारणांमुळे सदरचे पोर्टल काही दिवस बंद ठेवण्यात आले होते. दि.२८ जुलै पासून ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे.


सदरच्या प्रवेश परीक्षेच्या आवेदनपत्रामध्ये माहिती भरताना विद्यार्थ्यांकडून काही चुका झाल्याने त्या दुरुस्त करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विद्यार्थी व पालक वर्गाकडून मागणी होत होती. त्यानुसार आवेदन पत्रातील चुकीची माहिती दुरुस्त करण्यासाठी शिक्षण मंडळामार्फत पोर्टल वर Edit Options उपलब्ध करून देण्यात आला आहे.


शनिवार दि.३१-०७-२०२१ (सायंकाळी ५.०० ) ते सोमवार दि.०२-०८-२०२१ ( रात्री ११.५९) पर्यंत ही सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विद्यार्थी ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, परीक्षेचे माध्यम, पत्ता, प्रवर्ग बदल, याशिवाय इतर काही बाबींमध्ये बदल करता येणार आहे. सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भातील विद्यार्थी, पालक , शिक्षक यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here