आंदुर्ले गावात झपाट्याने वाढणारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या लक्षात घेता आंदुर्ले गावं सोमवार दि.14 ते रविवार दि.20 या सात दिवसासाठी कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय ग्रामपंचायत आणि कोरोना नियंत्रण समिती यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थ व दूकानदार यांचे सात दिवसात सहकार्य अपेक्षित असून कृपया कोणीही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच आपल्या गावात, शेजारी आलेला कोरोना आपल्या घरात यायला वेळ लागणार नाही याची जाणीव ठेवून कृपया सात दिवस सहकार्य करा अशी कळकळीची विनंती गावच्या प्रथम नागरिक सौ .सर्वेकर यांनी ग्रामस्थाना केली आहे. तसेच या बंद दरम्यान विनाकारण बाहेर पडाल तर कोणत्याही क्षणी फिरत्या पथकाकडून रॅपिड टेस्ट होऊ शकते .
विनाकारण फिरणाऱ्यांना दंड तसेच गुन्हा दाखल होईल. त्याचप्रमाणे सर्व दुकानें, हॉटेल, धान्य दुकान सोमवार ते रविवार बंद राहतील याची नोंद घ्यावी.
कृपया सर्वांनी जबाबदारी ओळखून सहकार्य करा.कुटुंबातील व्यक्तींना समजावून सांगा, वाडीत शेजारी सांगा. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करा अशी कळकळीची विनंती त्यानी समस्त आंदुर्ले वासीयांना केली आहे.