अडाळी एमआयडीसीची सुविधाविषयक कामे पूर्ण करा – पालकमंत्री उदय सामंत

0
89
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत

अडाळी एमआयडीसीबाबत रस्ता आणि अनुषंगिक सुविधेची दर्जेदार कामे पूर्ण करावीत, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. अडाळी एमआयडीसीबाबत आज आढावा बैठक घेतली. बैठकीला आमदार दीपक केसरकर, तहसीलदार अरुण खानोलकर, राजाराम म्हात्रे, प्रादेशिक अधिकारी प्रशांत पाडळकर, कार्यकारी अभियंता सचिन राक्षे, उपअभियंता अविनाश रेवणकर, संजय पडते, बाबुराव धुरी यांच्यासह अडाळी ग्रामस्थ उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन त्यांच्या समस्या सोडवाव्यात. येणाऱ्या प्रकल्पाबाबत स्थानिकांना काय रोजगार मिळणार आहे, याची यादी तहसीलदारांनी द्यावी. तिलारीचे पाणी येणार असल्याने के टी वेअरचे कामकाज थांबवावे. या ठिकाणी होणारी पायाभूत सुविधेची कामे ही दर्जेदार व्हायला हवीत. विकसित झालेली 15 टक्के जमीन प्रकल्पग्रस्तांना खास बाब म्हणून मिळण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा, असेही पालकमंत्री म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here