अतिवृष्टीमुळे सीईटी न दिलेल्यांना 9, 10 ऑक्टोबरला मिळणार संधी- उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

0
167
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत

मराठवाड्यात गेले दोन दिवस अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे महत्वाची सीईटी प्रवेश परीक्षा जे विद्यार्थी देऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना ९ आणि १० ऑक्टोबर रोजी परीक्षेसाठी पुन्हा संधी देण्यात येत असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही ग्रुपच्या उमेदवारांना दि.१ ऑक्टोबर ते ३ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत वरील कारणांना अनुसरून पात्र उमेदवारांना ई-मेल व एसएमएसद्वारे कळवण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क यापूर्वी भरले असल्यामुळे त्यांची नि:शुल्क नोंदणी करून घेण्यात येईल. तसेच नोंदणी केलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रांच्या उपलब्धतेनुसार केंद्र व नव्याने प्रवेशपत्रे उपलब्ध करून देऊन दि. ९ व १० ऑक्टोबर रोजी पीसीएम व पीसीबी ग्रुपच्या अतिरिक्त परीक्षा घेण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here