अदानी ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळले

0
94

शेअर बाजाराचे नियमन करणाऱ्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड शेअर बाजाराचे नियमन करते.या NSDLla अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये तीन परदेशी गुंतवणुकदारां मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असल्याचे आढळून आले.त्यामुळे त्यांनी या तीन परदेशी गुंतवणुकदारांवर कारवाई केली आहे. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने या तीन परदेशी कंपन्यांची खातीच सील केली आहेत. या सर्वांचे पडसाद शेअर मार्केटमध्ये आता दिसून आले आहेत आणि त्यामुळे अदानी ग्रुपच्या कंपन्याच्या शेअरचे भाव कोसळले आहेत.

या तिन्ही गुंतवणूकदारांनी अदानी समुहाच्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जवळपास ४३ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे या गुंतवणूकदारांची खाती सील केल्याने याचा थेट परिणाम अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या समभागांवर (शेअर्स) झाला आहे. कंपन्यांच्या समभागांचे भाव कोसळले आहेत.खातेदारांच्या मालकी हक्कांविषयी पुरेशी माहिती न दिल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आलेली आहे असे वृत्त हाती आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here