‘अपंग व वयोवृद्ध व्यक्तींना तरुणांच्या बरोबरीने लसिकरण केंद्रावर पहाटे पासून उभे करून ठेवणे चुकीचे!’-जयेंद्र रावराणे.

0
98

पंग व वयोवृद्ध व्यक्तिंसाठी लसीचे डोस राखीव ठेवावेत-माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांचे वैभववाडी आरोग्य विभागास निवेदन

मंदार चोरगे / वैभववाडी
वैभववाडी येथील लसिकरण केंद्रावर सध्या १८ वर्षांवरील वयोगटातील व्यक्तींची लसीकरण मोहीम सुरू आहे. या लसीकरणाचा लाभ मिळावा म्हणून अनेक युवक पहाटे ५ वाजल्यापासून लसिकरण केंद्रावर उपस्थित असतात.


शनिवार वैभववाडी येथील लसिकरण केंद्रावरून अनेक वयोवृद्ध व्यक्तींना सकाळ पासून लसिकरण केंद्रावर उपस्थित असुन देखील रिकाम्या हाती परतावे लागले. ही खंत त्यांनी माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांच्या समोर व्यक्त केली.
लसिकरण केंद्रावर होणारी गर्दी पाहता तालुक्यातील वयोवृद्ध व अपंग व्यक्तींना तरुणांच्या बरोबरीने पहाटे पासून लसिकरण केंद्रावर रांगेत उभे राहायला लावणे ही बाब माणुसकिच्या दृष्टीने अतिशय चुकीची व लाजिरवाणी आहे. एकप्रकारे ही त्यांची अवहेलना आहे. परिणामी त्यांना लसिकरणापासून वंचित रहायला लागू नये. शिवाय तालुक्यातील सर्व लसिकरण केंद्रावर त्यांचे प्राधान्याने लसिकरण केले जावे अशा मागणीचे निवेदन माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी आज आरोग्य विभागास दिले.
यावेळी जयेंद्र रावराणे, आरोग्य अधिकारी अनिल पवार, माजी नगरसेवक संजय सावंत, प्राची तावडे, शुभांगी पवार,संदेश तुळसणकर व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here