छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता राम कपूर यांचे वडील आणि अभिनेत्री गौतमी कपूर यांचे सासरे अनिल कपूर यांचे निधन झाले आहे.राम कपूर आणि गौतमी कपूर यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
राम कपूर यांच्या वडिलांना अमूलने श्रद्धांजली वाहिली आहे. राम यांनी आपल्या सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. ‘अमूलने माझ्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. मला तुमची खूप आठवण येईल’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.अमूलची टॅग लाईन ‘अमूल द टेस्ट ऑफ इंडिया’ ही देखील अनिल कपूर यांनीच दिली होती.