अभिनेता विकी कौशल, सरदार उधम सिंग यांच्या दमदार भूमिकेत

0
57

अभिनेता विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘सरदार उधम’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.‘सरदार उधम’ हा चित्रपट 1919 साली जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित आहे. हा चित्रपट येत्या 16 ऑक्टोबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन शुजित सरकार यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी लाहिरी आणि शील कुमार यांनी केली आहे.

येत्या 16 ऑक्टोबर रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमोल पराशर एका विशेष भूमिकेमध्ये असणार आहे. ट्रेलरमध्ये सरदार उधम सिंगच्या जीवनाची झलक पहायला मिळते. इतिहासामध्ये खोलवर दडून राहिलेले अजरामर शौर्य, धैर्य आणि निर्भीडपणाची अनुभूती येते.1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये निघृणपणे मारल्या गेलेल्या प्रियजनांच्या मृत्यूचा सूड घेणा-या सरदार उधम सिंग यांच्या निश्चल धेय्यावर हा चित्रपट आधारित आहे.‘त्यावेळी जालियनवाला बाग येथे भरलेल्या शांतता सभेत गोळीबार करण्याचे आदेश देणाऱ्या मायकेल ओडॉयरची हत्या उधम सिंग यांनी केली होती. उधम सिंग हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचे नाव आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here