अभिनेता सुयश टिळक लग्नाच्या बेडीत अडकला

0
91

छोट्या पडद्यावरील ‘तू तिथे मी’ मालिकेतील अभिनेता सुयश टिळक गुरुवारी लग्नाच्या बेडीत अडकला. अभिनेत्री आयुषी भावे हिच्या सोबत सुयशनं सातफेरे घेतले. कोरोनामुळे मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. सुयश आणि आयुषीच्या लग्न समारंभाचे काही फोटो समोर येताच चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

‘राजर्षी मराठी’नं  इन्स्टाग्राम अकाउंटवर सुयश आणि आयुषीच्या विवाहाचे फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर सुयश आणि आयुषीची मेहंदी, हळद तसेच संगीत सेरीमनीचे फोटो सोशल व्हायरल झाले आहेत.सुयशनं काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री आयुषीसोबत गुपचूप आपला साखरपुडा उरकला होता.

तुझ्यात जीव रंगला’ फेम अक्षया देवधरसोबतही सुयशचं नाव जोडण्यात आलं होतं. मात्र, सुयशनं साखरपुड्याचे फोटो शेअर करत सर्वांनाच आश्चर्यचा धक्का दिला होता. आयुषी भावे लवकरच एका आगामी सिनेमात दिसणार तर सुयश ‘शुभमंगल ऑनलाईन’ या मालिकेत दिसला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here