अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि तिचा मित्र शुभम देगडे यांचा गोव्यात अपघाती मृत्यू

0
117

अभिनेत्री ईश्वरी देशपांडे आणि तिचा मित्र शुभम देगडे यांचा गोव्यात अपघाती मृत्यू झाला आहे. सोमवारी 20 सप्टेंबर रोजी उत्तर गोव्यातील बागा-कलंगुट येथे गाडी खाडीत कोसळून या दोघांचा मृत्यू झाला आहे.गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला. अपघातावेळी कार कोण चालवत होता, हे समोर आलेले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गाडी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. अपघातावेळी कार कोण चालवत होता, हे समोर आलेले नाही.गाडी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली आणि खाडीत जाऊन कोसळली. सकाळी साडेपाच वाजता अग्निशमन दल तेथे पोहोचले आणि त्या दोघांना गाडीमधून बाहेर काढले.’दोघांच्या हातावर क्लबचे रिस्टबँड होते त्यामुळे अपघातापूर्वी हे दोघेही एखाद्या क्लबमध्ये गेले असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

25 वर्षीय ईश्वरी पुण्याची आहे तर शुभम हा पुण्यातील किर्कटवाडी येथील रहिवाशी आहे.ईश्वरीने आजवर काही मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच ती हिंदी मालिकांमध्येही झळकली होती. काही दिवसांपूर्वी तिने एका मराठी चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते.लवकरच ईश्वरीचा पहिला मराठी चित्रपट येणार होता.अपघाताची माहिती मिळताच दोघांचे कुटुंबीय पुण्याहून गोव्यात दाखल झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here