अभिनेत्री कंगना रनोटच्या कारवर पंजाब शेतकऱ्यांचा कारवर हल्ला?

0
64

अभिनेत्री कंगना रनोटने हिमाचलमधून पंजाबमध्ये येत असताना शेतकऱ्यांनी तिच्या कारवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्री कंगनाने सोशल मीडिया इंस्टाग्राम स्टोरीमध्ये”मी पंजाबमध्ये प्रवेश करत असताना एका जमावाने माझ्या कारवर हल्ला केला. ते शेतकरी असल्याचे सांगत आहेत”अस लिहित एक व्हिडिओ शेअर केला आहे. कंगना रनोटने जमावाने घेरल्याचे व्हिडिओदेखील शेअर केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती.त्यावेळी कंगनाने भारताला ‘जिहादी देश’ असे म्हणत कंगनाने शेतकरी आंदोलनालाही ‘खलिस्तानी आंदोलन’ म्हटले होते. त्यावेळीदेखील तिच्या या विधानावर टीव्हीत पडसाद उमटले होते. कंगनाचं ट्विटर अकाउंट याआधीच हटवण्यात आले आहे तिने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून ही वादग्रस्त प्रतिक्रिया दिली होती. ज्यानंतर तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.आता तिला विधानसभेने समन्स बजावले आहे.

कंगना चंदीगडच्या दिशेने जात असताना रोपडमध्ये चंदीगड-उना हायवेवर जमावाने कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यामुळेच पंजाबमधील शेतकऱ्यांनी तिच्या कारला घेराव घातला तिला ते पंजाबमध्ये प्रवेश करू देत नव्हते. “शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांविरोधात केलेल्या टिप्पणीबद्दल कंगनाने शेतकऱ्यांची माफी मागायला हवी”, असे शेतकरी म्हणाले.

बऱ्याच प्रयत्नांनंतर जमावाने कंगनाला जाऊ दिले. यानंतर कंगनाने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तीने मी माझ्या शुभचिंतकांना सांगू इच्छिते की मी तिथून बाहेर पडले आहे. मी पूर्णपणे सुरक्षित आहे. ज्यांनी मला मदत केली त्या सर्वांचे आभार. पंजाब पोलीस आणि सीआरपीएफचेही आभार असे म्हंटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here